Wednesday 8 February 2012

नक्की कसं ?










                
                   
  "विवाहपूर्व मार्गदर्शन " या नावाची एक कार्यशाळा आम्ही घेतली होती. त्यामध्ये डॉक्टर्स ,वकील, इंजिनियरमाहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी पण छोटी मांडली जमली होती. काही एम.एस.डब्लू .काही कला क्षेत्रातले पदवीधर अशी बरीच मुलं-मुली जमली होती. त्या दिवशी अर्वाम्नी असा विचार करायचा होती कि, आपण ;लग्न करतांना काय विचार करतो? आपण स्वतः कसे आहोत याबद्दल आपल्याला किती माहिती आहे,आपल्या जोडीदाराविषयी  काय अपेक्षा आहेत. यामध्ये भरपूर  वाद झाले . काही वेळेस एकमत झालं . काही वेळेस वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील मुलांची मतं  पटली पण प्रत्यक्षात शक्य नाही असेही वाटले.
       खूप रंगलेला वाद होता,पत्रिका बघावी कि नाही,लग्न रजिस्टर म्हणजे नोंदणी पद्धतीने करावे की,वैदिक पद्धतीने .साहजिकच यात दोन  गट पडले. प्रत्येक जण आपापला मुद्दा पटवून देवू लागले.
    एका गटाचा आग्रह होता की पत्रिका बघण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा रक्तगट तपासा. एवढेच नाही तर रक्ताच्या इतरही चाचण्या करून घ्या. एकमेकांची मतं,विचार पटतात का? ते बघा. कारण पत्रिका जमली रंग,रूप,उंची पण जमली पण एक महिन्यानंतर किंवा फार ताणले तर एक व्र्षान्न्त्र नातं जास्त दृढ होण्यासाठी लागणारे परस्पर पूरक विचार पटले नाही तर या कशाचाच उपयोग होत नाही. कारण एखाद्याला एखादीला नाटक ,गानं अतिशय आवडत असतं ते सोडणं म्हणजे स्वतःला विसरनं अस वाटतं .पण तेच जोडीदाराला आवडत नाही. कटी दिवस शांत बसून घुसमट सहन करणार. कधीतरी याचा स्फोट होणारच ना? तो होवू नये  अशी इच्छा असेल तर आता मुला-मुलींना एकमेकांना मोकळेपणी भेट येवू शकते. तेव्हा त्यांनी एकमेकांचे विचार,स्वतःची ओळख ,सांगायला हवी. असे त्या गटाचे म्हणणे होते.ह्या गटाचे अजून एक ठाम मत होते.ते विवाह नोंदणी पद्धतीनेच करावा. कारण त्यामुळे पैसे तर वाचतातच शिवाय श्रमही वाचतात. अनावश्यक कर्मकांड करावी लागत नाहीत आणि वेळ वाचतो. हे सर्वांना मान्य होतं पण प्रत्यक्षात कसं आणायचं हे कळत नव्हतं .
       पण दुसरा गट पत्रिकेवर आणि वैदिक मंत्रावर ठाम होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण समाजाचे भाग असतो त्यामुळे सर्वांना बोलवायलाच हवं लग्नाला. सर्वजण जमल्यामुळे नवरा-नवरीला बांधिलकीची भावना निर्माण होते. त्यांना जेवणावळी व इतर सर्व खर्च आवश्यक वाटत होता. खरतर हे सर्व बोलणारी मुलं मुली उच्चशिक्षित होती. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की मुलगा-मुलगी दोघेही नोकरीत आहेत मग त्यांच्या जवळ साचलेल्या पैशातूनच त्यांनी लग्नाचा खर्च करावा. पालकांकडून घेवू नका. तेव्हा त्यांनी सगळ्यांनीच विरोध केला. कतीत अतार्किक गोष्टींचा त्यांच्या मनावर पगडा होता.अर्थात हा आपल्या संमिश्र समाजाचाच चेहरा होता.
 म्हणून आम्ही या दोन्ही गटासाठी काही मुद्दे चर्चेला ठेवले.
  १) रक्ताच्या तपासण्या ( एड्स ,थाल्सेमिया ,कवील बी ) ह्या दोघांनी कराव्यात . त्यासाठी कोणा एकाला बळजबरी  नको.
  २)आपण ज्या वैदिक मंत्राच्या संस्कारांच्या गोष्टी करतात त्या संस्कृतीचा,संस्कारांचा आपण अभ्यास केलेला असतो का?
  ३)आपण समाजाचे घटक आहोत असं आपण म्हणतो . तेव्हा नेमका कोणता समाज आपल्या डोळ्यांपुढे असतो? आपले नातेवाईक मित्र मंडळी म्हणजे समाज का? ज्या समाजात असंख्य माणसं रोज उपाशी असतात त्या समाजाचा विचार न करता आपण दागदागिने शालू-शेले,बांड-वराती ,जेवणावळी ,निरर्थक मानपान करणं हे असभ्य नाही का? या समाजाचे आपण घटक नाही का?
४)अनेक  लोक जमल्याने जो खर्च होतो त्याने  बांधिलकी निर्माण होते ?
  ५) सर्व राहणीमन आधुनिक हवं मग विचार आधुनिक  का नको?
     या सगळ्याची उत्तरे शोधण्याचे प्रॉमिस त्यांनी केले. आम्ही पण आमच्यासाठी  नवीन मुद्दे शोधण्याच्या विचारात राहिलो .
 

,

No comments:

Post a Comment