Monday, 6 February 2012

नमस्कार

     नमस्कार,खर तर सस्नेह नमस्कार, खरतर ब्लॉगच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मी काय लिहणार आहे आणि तुम्ही काय वाचणार आहात.तुमचा अंदाज बरोबर आहे.सूर हे मित्र-मैत्रिणीशी जसे जुळायला लागतात ,तसेच निवडलेल्या जोडीदाराशीही जुळायला लागतात.ते जुळण्यासाठी आपल्याकडे काय हवं,दृष्टीकोन कसा हवा.हे आमच्या काही अनुभवातून आम्ही तुमच्या पुर्यंत पोहचवणार आहोत.
       आजपासून आम्हीही या ब्लॉग विश्वातून तुमच्याशी संवाद साधणार आहोत.तुमच्या सगळ्याशी बोलण्यासारखं आणि share करण्यासारखं खूप आहे.ते फोन वर नीट होत नव्हतं.वेळेचा प्रश्न आपल्या सगळ्यांना भेडसावतो.
        आमचे लग्न इच्छुक मित्र-मैत्रिणी यांच्या खास आग्रहा वरून हा ब्लॉग सुरु होत आहे.ज्यांनी हा ब्लॉग सुरु करण्यासाठी आम्हांला प्रेरणा दिली,त्यांना lot of thanks.कारण त्यांच्या मुळेच आपण एकमेकांशी जोडलेलो राहू.आपल्या अडचणी एकमेकांना कळतील.तुम्हांला काय वाटते.

        मित्रांनो असं म्हणतात की,भारतात  युवक -युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.त्यातील बहुतेक जण लग्न करण्याच्या वयाचे आहेत.पण ते काहीच बोलत नाही.म्हणजे लग्नाबद्दल हो.तुम्हांला काय वाटते.लग्न या  विषयावर बोलायला हवे की नको.आपण पार दिल्लीच्या गोष्टी करतो.पण स्वतःला जोडीदार कसा हवा याचा विचार त्याच्या "दिसण्या "पलिकडे करतच नाही.कालच आम्हांला एक व्यक्ती म्हणाली ,""मला जोडीदार सुंदरच हवा" पण सुंदर ही कल्पना किती सापेक्ष आहे,याचा विचार ती व्यक्ती हे सर्व म्हणतांना करत नाही. असंच काही आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत.
      हं पण लग्न करतांना मात्र   स्वतःशी ओळख असायला हवी.खरच आपण स्वतःला ओळखत नाही आणि लग्नाला उभे राहतो आणि अडचणींना तोंड देतो.म्हणून सुरुवात करुया   स्व-ओळखी पासून .आवडेल  तुम्हांला?

No comments:

Post a Comment