Thursday, 23 February 2012

काळ बदलला.

आजी तू बडोद्याहून या छोट्या खेड्यात कशी आलीस? सांग ना?
 आजी खुशीत असली आणि आमच्या बरोबर अघळ पघळ बोलायला तयार असली की आम्ही हमखास हा प्रश्न विचारायचो . कधी कधी ती उडवा उडवीची उत्तरे देई .म्हणे आले विमानतून नाहीतर तुझ्या या कंपूतून . आम्ही कम्प्युटरला कोणत्याही नावाने हाक मारायचो किंवा तो चालत नाही,मूर्खच आहे.असं काहीतरी बोलायचो.तर तिने त्याचे नाव पप्पू  सारखे कंपू ठेवले होते. आजी कधी कधी गंभीरपणे तिच्या लग्नाची गोष्ट सांगत असे. ती म्हणे ह्यांच्या वडीलांनी की आजोबांनी मला एकदा कोणाच्या तरी घरी पहिले होते. मग त्यांनी कोणाची कोण चौकशी केली पण पत्ता विसरले.मग काय करणार .परत ते बडोद्याला आले,ज्यांच्या घरी उतरले होते तिथे गेले आणि पत्ता शोधला.मला आठवत नाही पण बहुतेक १३ व्या वर्षी  माझे लग्न झाले. काही अंतर चालत ,मग बैलगाडीत ,मग मोटारीत .अशी दरमजल करीत आमची स्वारी इथे आली.
     म्हणजे तू आबांना पाहिलंच नव्हतं.
          नाही ग बाई.तेव्हा काही क्लीकची सोय नव्हती.
तिला क्लिक ची फार गंमत वाटायची . तिच्या नातवंडांना सगळ्या गोष्टी क्लिकवर लागतात किंवा क्लिक व्हायला लागतात. असं ती कधी आरोप म्हणून तर कधी कौतुक म्हणून सांगायची.
     बरं जावू दे. तू आत्याचं लग्न कसं ठरवलस ?
तुला काय करायच्या फालतू चौकश्या?तू जमवलस ना क्लिक वर?
  हो.माझं लग्न ऑन लाईन वेब साईट वरून जमलं म्हणून ती असं बोलते.मी लग्न ठरवले तरी मला लग्नाच्या फालतू चौकश्या करते म्हणून रांगवते .तरी तिने आत्याच्या  लग्नाचे सांगायला सुरुवात केई.
    आम्हाला शेजारच्यांनी माहिती सांगितली. म्हणून मी पत्र लिहले .तर मुलगा कुठे शिकायला गेला होता. मग काय करणार?मी धाडसाने त्याचा पत्ता विचारला आणि मुलीचा फोटो आणि माहिती दिली पाठवून . वर त्याला बजावलं ,तुला आवडली नाही तर हरकत नाही पण मी तुला माहिती पाठवली हे घरी कळवू नकोस.
      आजीच्या काळातली तिची ही कृती म्हणजे एक धाडसच होते.पण तिने ते केले. आज जेव्हा आपण फोन,मोबाईल,नेट यांचा वापर करतो आहोत,तेव्हा आपल्याला या गोष्टींचं कदाचित महत्त्व वाटणार नाही. पण त्या काळात म्हणजे ३५ वर्षापूर्वी या सर्व गोष्टी खूप अवघड होत्या.
    आता काळ अधिक वेगाने बदलत आहे. तुम्हांला माहित असेल २०२० साली जी मोबाईल क्रांती भारतात अपेक्षित होती ती २००५ सालीच आली. म्हणजे हे ध्येय आपण आधीच पूर्ण केले. मोबाईल ही गरज झाली. स्वतःचा पीसी ,laptop असणं ,त्यावर अधिक वेगाने काम करणं,हे काळाबरोबर राहण्यासाठी आवश्यक झालं आहे.बघा ना मी ज्या आजीच्या लग्नाचा उल्लेख केला त्यात एकमेकांना भेटण,एकमेकांची माहिती गोळा करणं आणि ती विश्वासार्ह्य आहे की नाही ते ठरवण हे किती अवघड होतं . शिवाय  ती कोणत्या गावात येणार ,ते कसं असणार याबद्दल तिला कोणी माहिती दिली नाही की ती माहिती मिळवण्याचा स्त्रोतही उपलब्ध नव्हता.

    पण आज तिच्या नातीला जेव्हा लग्न करायचे आहे,तेव्हा तिला विवाह संस्थांची मदत होवू शकते . त्याच बरोबर ऑन लाईन विवाहसंस्थावर नोंदणी करून ती तो मुलगा ,त्याचे शहर ,कंपनीची जागा याची सर्व माहिती त्या मुलाला न भेटता घेवू शकते.आज तिची ती गरज आहे. कारण आपल्या राहण्याची,काम करण्याची जागा दूर आहे. तिथे जाण्या येण्यासाठी तिचा वेळ जातो. शिवाय प्रत्येक वेळी कोणाच्या घरी जावून भेट द्यायची किंवा कोणाला आपल्या घरी बोलवायचं म्हणजे वेळ आणि पैसा दोघांचा व्यर्थ जाईल. म्हणून विवाह जमविण्यासाठी ती नव्या माध्यमाचा उपयोग करत. काहीजण हे नवे मध्यम जुन्या पठडीत वापरतात.पण बदल होत आहे. हे मात्र   नक्की .

   मित्रानो आपण काळाबरोबर राहण्यासाठी भौतिक वस्तूंचा खूप उपयोग करतो किंवा ते आपण वापरतो म्हणजे आपण आधुनिक आहोत असेही म्हणतो.
   पण विचार करण्याचा तो बदलण्याचा   वेग मात्र अतिशय मंद आहे. संवादाची सर्व कौशल्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथेच करतो. या संवादाचा वापर आपण आपल्या नातलगांसाठी केला तर अधिक ताणरहित आपल्याला राहता येईल.
     अनेक अशा विवाह संस्था आहेत  की ज्या ऑन लाईन काम करतात. त्यांना समाजाची गरज समजली आहे. आपलं फक्त महत्वाचं काम हे आहे की आपण कोणती संस्था अधिक विश्वासार्ह्य आहे. हेपण विचार करण्याचा तो बदलण्याचा   वेग मात्र अतिशय मंद आहे. संवादाची सर्व कौशल्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथेच करतो. या संवादाचा वापर आपण आपल्या नातलगांसाठी केला तर अधिक ताणरहित आपल्याला राहता येईल.
     अनेक अशा विवाह संस्था आहेत  की ज्या ऑन लाईन काम करतात. त्यांना समाजाची गरज समजली आहे. आपलं फक्त महत्वाचं काम हे आहे की आपण कोणती संस्था अधिक विश्वासार्ह्य आहे. हे बघण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी आपल्याला योग्य माहिती मिळेल ,शिवाय निर्णय घेण्यासाठी ,स्वतःच्या समस्या मांडण्यासाठी जागा असेल.आपलं कोणी ऐकून घेईल . त्यावर उपाय  सुचवील अशा संस्थेकडे जावे.
   मित्रांनो आपण सर्वजण वस्तूंचा उपयोग करण्यात पुढे गेलो आहोत ,आता विचारांचा मागोवा घेवू या. आणि बघू या काही बदल स्वीकारता येतात का? पण हे बदल नक्की कोणते हे मात्र आपण पुढील काही सदरात पाहू या.

No comments:

Post a Comment