Saturday, 18 February 2012

जोडीदाराचा शोध


जोडीदाराचा शोध
 हे बघ पोरी तू माझ्या मुलाचं लग्न जमवून दिलं तर मी मस्त बक्षीस देईन तुला.पार कलवरिचा मान देवून चांगली पैठणी नेसविनआमच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या काकू म्हणत होत्या.
    मला हा भाग जरा गमतीचा वाटला.काय बोलणार त्यांच्याशी?तरी मी म्हटलं,कशी मुलगी हवी तुम्हांला? आमच्या मुलाच्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करणारी. मी मनात म्हटलं,याला काय अर्थ आहे? तुमच्या  मुलाने /मुलीने  १०० मुली/मुलं पहिल्या तरी असं काही होणार नाही.कारण जोडीदार निवडतांना तो तरी परिपूर्ण आहे का? याचा विचार त्याने केला आहे का?
    आज अनेक मुलं-मुली,जोडीदार निवडीचा निर्णय घेवू शकत नाही.याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते स्वतःला पुरतं ओळखत नाही. जी व्यक्ती स्वतःलाच ओळखत नाही ती सहजीवनासाठी योग्य व्यक्तीचा शोध कसा घेणार?कारण ते एकाचवेळी अनेक ठिकाणी माहिती बघतात आणि त्यांचे मन सतत हेलकावे खात राहते. मुख्य म्हणजे अशा लोकांचे स्वतःवर खूप प्रेम असते. त्यामुळे ते दुसऱ्याकडून खूप अपेक्षा करतात. त्यांच्या मनात या अपेक्षांचा आणि स्वतःला ण ओळखण्याच्या स्थितीमुळे खूप गोंधळ उडतो व ते निर्णय घेवू शकत नाही.
       जेव्हा आई-वडील किंवा इतर कोणी या मुलांना माहिती देतात किंवा निर्णय घेण्यास मदत करू इच्छितात तेव्हा ते म्हणतात,ठीक आहे,नंतर बघू,आत्ता लगेच काहीच सांगता येत नाही,नंतर विचार करून सांगीन.... काही जण समोरच्या व्यक्तीला स्पष्ट हो-नाही काहीच सांगत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने फोन करावा की करू नये,काय आवडेल हे त्यानाही कळत नाही.त्यामुळे दोन्ही बाजूला निर्णय घेतला जात नाही.काहीवेळेस ही मुलं-मुली बाहेर मित्र-मैत्रीणींत मोकळी राहत असली तरी ते एका रिजिड कुटुंबातून आलेले असतात. जोडीदार शोधतांना ते त्या दृष्टीने बघतात आणि त्यामुळे चांगल्या गुणांचा जोडीदार एखाद्यावेळी डावलला जातो. अशावेळी त्यांनी एखाद्या समजूतदार व्यक्तीशी बोलायला हवे आणि ते ही लवकरात लवकर. नाहीतर वेळ निघून गेली की वाढलेलं व् फक्त हातात येतं. कारण ‘लग्नाचा’क्षेत्रात तिथलेच नियम लागू होतात. तुमचं वाढलेलं वय हे तुम्हांला लग्नाच्या बाबतीत खूप मागं नेवून उभं करू शकतं.मग तुम्ही सुरुवातीला केलेल्या अपेक्षा क्मिक्र्त आणतात आणि हाती मात्र कोणतीच मनासारखी गोष्ट मिळत नाही.
    नितीन आणि रेखा कायम निर्णय घ्यायला घाबरायचे.त्यांना कोणताच वाईटपणा पत्करायचा नसायचा किंवा धोका वाटायचा. त्याची जबाबदारी कशी घेणार हे त्यांना कळायचे नाही.ते त्यांच्याच विचारात अडकून राहयचे. जसे एखाद्या ठिकाणी जायला अनेक रस्ते असतात. एका रस्त्याने चालायला लागले की त्यांना वाटायचे दुसरा रस्ता अधिक चांगला आई जवळचा आहे.असं करत करत ते प्रत्येक रस्त्यावरून थोडे थोडे चालले पण योग्य ठिकाणी पोहचले नाही.
  खरं तर आज सगळीकडे झपाट्याने बदल होत आहेत,आपण ते स्वीकारतही आहोत. अशा धावपळीच्या अस्थिर,असुरक्षित जगात कोणताही निर्णय पूर्ण चुकीचा किंवा पूर्ण बरोबर असा नसणारच. तो व्यक्ती सापेक्षच असणार.स्थळ-काळानुसार त्यात बदल होत जाणार. म्हणून पूर्ण विचार करून योग्य निर्णय घेणं गरजेचे आहे. तो घेतांना धाडस लागते हे नक्की.आपण लहानपणापासून स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही, rather तशी सवयच आपल्याला कोणी लावलेली नसते.मोठ्या माणसांनी सांगितलेलं आपण निमूट ऐकायचं. हाच शिरस्ता सर्वसाधारण घरात असतो. त्यामुळं मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही.पण जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेत एखादी व्यक्ती स्वतःच निर्णय घेवू लागली तर लगेच आक्षेप घेतले जातात.आता हेच बघा ना?संजयची आई नेहमी म्हणायची,माझा मुलगा माझ्या हाताबाहेर नाही’पण आज तो आईने कितीही स्थळं दाखवली तरी ते बघायला तयार नाही. त्याला काहीच करू वाटत नाही. म्हणून मित्रांनो निर्णय घ्यायला घाबरू नका. नाहीतर लग्नासाठीचे तुमचे वय  वाढत जाईल,तुमच्यासाठीचा चाललेला योग्य जोडीदाराचा शोध थांबवाबा लागेल.
    .

No comments:

Post a Comment