Friday 10 February 2012

मैत्रीचा हात



  आमच्या कडे नेहमी इतिहासाचे अभ्यासक असणारे काका येतात. खरं तरं ते वयाने फार मोठे नाहीत.पण आजकाल नुकतच लग्न झालेल्या व्यक्तीलाही काका uncle  म्हणायची पद्धत आहे. त्यानुसार आम्ही त्यांना काका म्हणतो. तर हे काका दरवेळी इतिहासातील काही गमती-जमती सांगतात आणि आम्ही त्या सहज लक्षात ठेवतो. कारण त्यांची सांगण्याची पद्धतच मुली शिकविण्याची नाही तर मनोरंजनातम्क आहे .तर एकदा बोलता-बोलता त्यांच्या लग्नाचा विषय निघाला आणि आम्ही लगेच त्यांना चिडवण्यासाठी विचारायला लागलो की, काका तुम्ही लग्न करण्यापूर्वी याचा नक्कीच शोध घेतला असेल ना? की पहिलं लग्न कोणाचं झालं असेल? किमान  भारतात नाहीतर महाराष्ट्रात तरी. त्यांनी कपाळाला हात लावला आणि निघून  गेले .
       पण पहिल्या लग्नाचा काही शोध लागला नाही. पण अनेकांनी पूर्वी लग्न कशी होत याची वर्णनं मात्र पल्लेदार वाक्यामध्ये सांगितली. खरं तर पूर्वी लग्न हि पंचक्रोशीतच व्हायची. दोन्ही घराणी एकमेकांना चांगली माहित असतं. मुल-मुली लहान असत, त्यामुळे त्या घराला पाहिजे तसं वळणं  लावत वगैरे . नंतर मात्र लोकसंख्या वाढत गेली.कामाच्या निमिताने स्थलांतर होवू लागले. त्यामुळे लग्न जमविण्यासाठी नातेवाईक ओळखी पाळखीच्या लोकांची मदत घेतली जाई. अजूनही काही प्रमाणात या गोष्टी होतात. पण त्याचेही प्रमाण कमी होवू लागले आहे.
   आज शिक्षणासाठी ,नोकरीसाठी मुलं-मुली परराज्यात ,परदेशात जायला लागली. उच्च शिक्षण घेवू लागली. त्यामुळे लग्न उशिरा व्हायला लागली. त्यातून अपेक्षांचे डोंगरही वाढायला लागले. शिवाय शहरांचा विस्तार व्हायला लागला त्यामुळे नातेवाईक मित्र-मैत्रिणी यांची घरेही लांब लांब व्हायला लागली आणि त्याच बरोबर संबंधामध्ये काही अंशी अंतर यायला लागले. पूर्वी जशी सगळ्यांची माहिती सगळ्यांना असे तशी माहिती आता असणे अशक्य झाले. कारण जीवनाचा प्रवाहच एवढा वेगाने वाहयला लागला की मुला-मुलींच्या बाबतीत पालकही काही बाबतीत अनभिज्ञ असतांना दिसतात. त्यामुळे नातेवाईक लग्नाला  इच्छुक  असणार्या मुला-मुलींची नीट माहिती सांगू शकत नाही. शिवाय त्यांना माहिती बद्दल खात्री  वाटत नाही . कशाला या भानगडीत पडायचे असाही काहींचा दृष्टीकोन असतो. या परिस्थितीत बहुतेक शहरांमध्ये विवाहमंडळांचा जन्म झाला असावा.
      सुरुवातीला विवाहमंडळांना ही लोकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. कारण प्रत्येकजण हे दाखवून देण्याच्या मागे असायचा की ,आमच्या मुलीचे -मुलाचे लग्न जमवायला काही सुद्धा त्रास झाला नाही. काही ठिकाणी ते खरे असायचे पण सुरुवातीला विवाह मंडळात फी भरून नाव नोंदवायला नको म्हणणारे आता सर्रास विवाह मंडळाची पायरी चढतात. आणि खरं तर काळाच्या ओघात बदलण्यासाठी लाज बाळगायलाच नको . विवाहमंडळातली माणसं प्रत्यक्ष दिसत होती. काहीवेळेस तिथं जावून लोक आपल्या मनातलं बोलत असतं. त्यातून त्यांचा एक छान ऋणानुबंध जोडला  जाई .
     आज या धावत्या आणि पसरलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हेच विश्वासाचे ,मैत्रीचे आणि बंध जोडण्याचे काम ऑनलाईन  विवाह संस्था करीत आहेत. आज काही ऑन लाईन विवाहसंस्था खरोखरच लोकांचा वेळ आणि पैसा वाचवीत आहे. शिवाय त्यांना घरबसल्या थोड्या वेळात अगदी खरी विश्वासार्ह्य माहिती मिळते . खूप जणांचे    यासाठी लागणाऱ्या पैशाबद्दल आणि विश्वासार्ह्य ते बद्दल तक्रार असते. म्हणूनच आपण या ऑन लाईन संस्थांचे कार्य कसे चालते ? त्यांचे कार्यालय कुठे आहे? हे समजून घेतले पाहिजे. कोणतीही ऑन लाईन विवाहसंस्था  एखाद्या व्यक्तीचे प्रोफाईल देतांना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खरया आहेत की नाही हे अनेक पद्धतीने पडताळून घेते आणि मगच ती माहिती नेटवर उपलब्ध करून देते. जी संस्था पूर्ण सामाजिक भावनेने आणि जबाबदारीने हे काम करत असते. शिवाय एखाद्या व्यक्तीचे प्रोफाईल आवडले तर त्यांना एकमेकांशी संवाद कसा साधता येईल . त्यांना येणारे अडथळे कसे दूर करता येतील याची पूर्ण काळजी घेते.
      पण आपण मात्र अजूनही या नवीन तंत्रज्ञानाची आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर मदत घ्यायला कचरतो. ज्या नेटच्या सहय्याने लोक जग जिंकण्याची इच्छा प्रदर्शित करतात तेच लोक आपल्या जोडीदाराच्या शोधासाठी मात्र नेत नको म्हणतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथं देलेल्या माहितीवर त्यांचा विश्वास लगेच बसत नाही आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्वतःचा अहम . आपण नेट वर दिलेल्या माहितीचा पडताळा विवाह संस्थेला प्रत्यक्ष भेट देवून फोन करून पत्र पाठवून नक्कीच घेवू शकतो. दुसरी गोष्ट स्वतःचा अहम . तो मात्र दोन्ही कडच्या लोकांमध्ये असतो. फळे आप -फळे आप म्हणता म्हणता मुला-मुलींचे वय वाढते आणि वाढत्या वयानुसार येणाऱ्या समस्याही वाढतात. मुळात बहुतेक ठिकाणी मुलगा-मुलगी एकुलते एक असतात. त्यांना तडजोड करणे अवघड जाते. वयाबरोबर मतेही ठाम होतात. योग्य मतांसाठी ठाम असणे चुकीचे नाही,पण एखाद्या सामान्य मतामुळे ते तडजोड करण्यास तयार होत नाही. अशावेळी घ्म्भीर समस्या निर्माण होतात. पुढे मुलं होण्यास ती सांभाळण्यातही अडचण निर्माण होते.
     मग एखादी मावशी -काकू म्हणते आमच्या वेळी नव्हतं बाई असं काही. वय लहान असल्याने किंवा योग्य वयात लग्न झाल्याने त्यांना कदाचित समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. पण आज आपण आपल्याला मदत करणाऱ्या ऑन लाईन विवाह संस्था असूनही त्यांची मदत घेत नाही. खरच आपण त्यांना आपल्या मैत्रीचा हात पुढे करू या त्या नक्की एक सुयोग्य जोडीदाराशी आपली गाठ घालून देतील. चला बदलायला सुरुवात करू या.

No comments:

Post a Comment