Monday, 13 February 2012

कधीही


Madam  मला याच वर्षी लग्न करायचं आहे. अहो आधीच किती उशीर झाला आहे. मी ते म्हणतात ना  तसं गुडघ्याला बाशिंग लावून बसलोय.पण.
     मंगेशचं  बोलणं नेहमी या पण वर अडकायचं. तो २९ वर्षाचा आहे. त्याला सेटल होवूनही ४-५ वर्ष झाली आहेत.पण त्याला जर काही माहिती सांगण्यासाठी फोन केला तर तो म्हणायचा,नंतर बोलू या. प्लीज आपण जर विचारलं नंतर कधी तर तो म्हणायचा,कधीही’
     आज सगळेजण खूप धावपळीत असतात,या धावपळीत अनेक कामं अंगावर आदळतात. कोणतं काम आधी करायचं,कोणतं नंतर याचे निकष सगळ्यांनाच लावावे लागतात. महत्वाची कामं ही आर्थिक फायदा,आर्थिक तोशीस,एखादं काम पटकन करण्याची शक्कल,कंपनीचे काम या नुसार ठरविली जातात.या सर्वांमध्ये मागे उरणारी कामं अशी असतात ती ‘कधीही’केली तरी चालतील. असं मंगेश सारख्या मुलांना वाटते.मंगेश ‘लग्न’ ही गोष्ट खूप सहजपणे घेत होता.तो त्यात गंभीर नव्हता. त्यामुळे त्याला मुलीकडचे विचारायचे तेव्हा तो ‘कधीही’पद्धतीने उत्तर द्यायचा.
   मित्र मैत्रिणीनो जगातील कोणत्याही कॅलेंडर  मध्ये’कधीही’ नावाचा दिवस नसतो.त्या अंकाची तिथी किंवा तारीख नसते.याचाच अर्थ असा की,’कधीही’कधीच उगवत नाही. कधीही चालण्यासारखं काम कधीच होत नाही. आता मंगेशला या ‘कधीही’चा अनुभव येवू लागला आहे.
     मी मंगेशला नेहमी सांगायचे की,कधीही करण्यासारखी कामं कोणती असतात?त्याची एकदा यादी करून पहा.अमुकला फोन,तमुकला भेटणं,अमुक वाचणं,तमुक पाहणं अशा यादीत त्याने मुलगी पाहणं हेही काम बहुतेक टाकलं असावं. यातील काही कामं शांतपणे,सहज वाटलं म्हणून,सवड मिळाली म्हणून करायची असतात.पण शांतपणा,सवड मिळत नाही आणि ती काम कधीच होत नाहीत.मंगेशला वारंवार सांगूनही त्याला ते कधी पटलं नाही. तो प्रत्येकवेळी नंतर कधीतरी म्हणायचा.पण लग्न ही गोष्ट आयुष्यभराची आणि खूप वैयक्‍तिक व महत्वाची गोष्ट आहे.ती कधीही कशी होवू शकेल.
मंगेश आम्हांला टाळण्यासाठी ‘जमणार नाही’असं उद्धटपणे न म्हणता नंतर कधीही म्हणायचा.पण त्यामुळे प्रश्न सुटायचा नाही.मग एकदा त्यला म्हटलं,आज कधीही केलं तरी चालेल असं काम करूनच टाकू.कदाचित त्यामुळे भविष्यातील ताण कमी होईल आणि तुला चांगला जोडीदार मिळेल व तुमच्यात समजुतीची वीण अधिक घट्ट होईल.
   मंगेशला आमचं हे म्हणणं २-३ वर्षांनी पटलं.पण आज त्याला ज्या गोष्टींच गांभीर्य वाटलं ते त्याचवेळी इतरांना वाटेलच असं नाही. असं जेव्हा त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला,माझ्या सारखी कोणाची गत होवू नये,त्यांनी लग्नाकडे ‘कधीही’करण्याची गोष्ट म्हणून न पाहता गांभीर्याने योग्य वेळी करण्याची गोष्ट म्हणून पहावी.असं मला वाटतं.म्हणून तुम्ही माझीच गोष्ट सांगा.मी ही ब्लॉगवर लिहितोच.की लग्न करायचं आहे हे जर ठरविलं आहे तर ते कधीही करू नका.योग्य वेळी योग्य निर्णय घेवून करा.

No comments:

Post a Comment