Monday, 12 March 2012

सहजीवन www.daptaryswiwah.com काल एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनावरील  काही प्रसंगाचे नाट्यीकरण केले होते. त्यांचे सहजीवन समता,मैत्र, आणि स्वातंत्रावर आधारलेलं होतं. सध्या आपण विवाह या विषयाचा अधिक विचार करत आहोत,म्हणून मला त्यांचे सहजीवन खूप महत्वाचे वाटले. कारण बहुतेक जणांना लग्न करायचे असते,पण त्यात सहजीवन फुलेलच याची खात्री वाटत नाही. किंवा तो विचारही काहींच्या मनात नसतो.
  विवाह ही समाजमनाच्या गाभ्याशी असणारी गोष्ट आहे. हजारो वर्ष चालत आलेली ती प्रथा असल्याने आपल्याला ती नैसर्गिक वाटते.पण ती मानवनिर्मित प्रथा आहे. त्यामुळेच तिच्यात कालानुरूप बदल व्हायला पाहिजे असं आम्हांला वाटते. कारण त्यामुळे विवाह जास्त अर्थपूर्ण होईल आणि काळानुसार येणाऱ्या अडचणीवर दोघं मिळून मात करू शकतील.अशा प्रकारचे नातेसंबध मानवी जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात.
     तरीही आंज अनेकजणांना वाटते की वैवाहिक सहजीवनात काही आनंद आहे का? असलाच तर तो शोधण्याची वाट कोणती? खरं तर या प्रश्नाचे उत्तर सोप्या शब्दात देता येईल पण तशी अमलबजावणी करणं हे प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून आहे. कारण स्वतः एक चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करत, अशाच दुसऱ्या चांगल्या माणसाची साथ शोद्था आली तर त्याचं सहजीवन आनंदी होण्याची शक्यता आहे. पर्ण प्रत्यक्षात आपल्या माणूसपणाच भान येणं,ठेवणं सोपं नाही. म्हणूनच आपल्या विचारांची,भावनांची,आपल्या जगण्याच्या मूल्यांची व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर सतत तपासणी करणं आवश्यक आहे. स्वतः समृद्ध होण्याची आस बाळगणारी व्यक्ती,स्वतःच्या विकासाचा विचार करत असतानाच इतरांच्या विकासाची आपल्या बरोबरीने वाटचाल होते आहे ना याचं भान ठेवते.
     म्हणूनच पतीपत्नीच्या नात्यात आनंद नांदण्यासाठी दोघांनीही स्वतःबरोबर जोडीदाराच्या भावना,विचार,विकास याची काळजी वाहण यासाठीच गरजेचे आहे. हे मला ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनातून जास्त लक्षात आले.

No comments:

Post a Comment