| "लग्न करणं " ही जबाबदारी आहे असं खूप जणांच मत आहे.आणि ते बरोबर ही आहे .दोन स्वतंत्र व्यक्ती आयुष्यभर एकमेकांच्या बरोबर राहणार असतात .त्यात ते दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वाढलेले असतात. त्यामुळे काही गोष्टींबाबत त्यांचे मत ठाम झालेले असते. ते ठाम मत बरोबर की चूक हे ते स्वतःला ओळखायला लागल्या शिवाय काही कळत नाही. स्वतःला नीट ओळखलं की कोणतही मत मग आपण दुसऱ्यावर लादत नाही.नीट चर्चा करून पटवून देतो.किंवा काही काही मतं कधीच एकमेकांना पटत नाही. पण त्याबरोबर आपण राहायला शिकतो.पण त्यासाठी लवचिकता हवी हे मात्र खरं.नाही का? |
No comments:
Post a Comment