Tuesday 14 February 2012

सुगंध शोधू या


  सुगंध शोधू या
      लग्नासाठी आम्ही एका छोट्या गावात गेलो होतो. लग्नही संत्र्यांच्या बागेत होतं .कारण ज्या मुलाचं लग्न होतं त्याने ती बाग फुलवली होती आणि त्या बागेबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याच्या आयुष्याला तो त्या बागेपासून सुरुवात करणार होता. विशेष म्हणजे त्या मुलीलाही या सर्व गोष्टींची आवड होती. विशेष म्हणजे त्या मुलीलाही या सर्व गोष्टींची आवड होती. ती हि शेतकी कॉलेजमध्ये शिकत होती . त्या दिवशी त्यांच्या गावच्या प्रथेप्रमाणे गावातील दोन यशस्वी जोडप्यांशी  गप्पा होत्या. यश हे त्यांनी पैसा,मुल,घरदार या हिशोबात मोजले नव्हते. तर त्या घरातील आनंद आणि स्वस्थता यावर त्यांनी लक्ष दिलं होतं .
   तर यातील एका जोडप्याने सांगितलं कि, आपण मुलीला-मुलाला किती पैसा ,दागदागिने ,भारीतले कपडे दिले या बाह्य पसाऱ्यावरच लक्ष देतो. आतली मुळं कशी आहेत त्यांना कसं पाणी  हवं आहे .याकडे लक्षच देत नाही. त्यामुळं लग्न झाल्यानंतर वर्ष-दोन वर्षातच सगळ्याचा कंटाळा येवू लागतो आणि आपण मॉल,शॉपिंग यांसारख्या गोष्टींकडे  धाव घेतो. त्यामुळे जीवनातलं खरं संगीत विकसितच होत नाही.
   फार अवघड आहे ना? हे सर्व स्न्जून घेणं .यासाठी एक लहानशी गोष्ट सांगते. मओत्से तुंगने याची लहानपणची आठवण लिहिली आहे. तो म्हणतो,.
        मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईची एक सुंदर बाग होती. तिच्या बागेतली फुलं बघायला दुरदुरच्या गावातून लोक यायचे. तिच्या फुलांची खूप स्तुती व्हायची आणि म्हातारपणीचा तिचा हाच एक आनंद होता तिची फुलं आणि तिचा बगीचा.पण एकदा ती खप आजारी पडली,तिला रोपांची देखभाल करणंहि शक्य होईना.तिला आपल्या आजारपणाचं एवढ दुःख नव्हतं.फुलं कोमेजायला लागली आणि रक्ताचं पाणी करून ज्यांना वाढवलं ती रोपं मरायची वेळ आली, याचं दुःख जास्त होतं.तिच्या आजारपणाची तिला काळजी नव्हती. फुलं नष्ट होणार यामुळं ती काळजीत होती,दुःखी होती.
  तेव्हा माओ तिला म्हणाला कि,घाबरू नकोस मी घेईन तुझ्या फुलांची काळजी आणि माओ सकाळपासून संध्याकाळ पर्यंत त्या बागेची काळजी घेवू लागला.पण दोन-चार दिवसांतच असं दिसून आलं कि,त्याचे सगळे प्रयत्नवाया जात आहेत. बाग उजाड व्हायला लागली. फुलं कोमेजायला लागली. पानं वाळू लागली. रोपं मरणोन्मुख झाली.पंधरा दिवसातच बाग सगळीच उजाड झाली. आईला थोडं बरं वाटायला लागलं तेव्ह ती बाहेर आली.बागेत जावून पाहिलं तर तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.माओ पण रडायला लागला. तो म्हणाला,मी एकेका फुलाला कुरवाळलं ,एकेका फुलाला पाण्यानं धुतलं ,एकूण एक पान पुसून स्वच्च केलं.त्यांच्या वरची धूळ झटकली. फुलं कोमेजतच आहे.
  त्याची आई म्हणाली,वेड्या डोळ्यातली आसवं पूस ,चूक कुठे झाली ते समजलं . तू हे विसरलास आणि  कदाचित तुला ठाऊक ही  नसेल,अरे फुलांचे प्राण फुलात नसतात,मुळात असतात. मुळं दिसत नाहीत.फुलं दिसतात.पानं दिसतात.मुळं जमिनीत लपलेली असतात.प्राण मुळात असतात.
     माणसाचं,त्याच्या जीवनाचही असंच असतं. वरवर एखाद्या व्यक्तीचं शरीर  सुंदर दिसतं ,त्यांचं जीवन खूप समृद्ध वाटतं,ते त्याच्या कामात,त्याच्या दिनचर्येत त्याच्या घरात पण त्याच्या आत कोणती समृद्धी आहे ती लपूनच राहते. सुंदर घर,गाडी,सुखसोयी,स्पर्धेच्या रेट्यातील शिक्षण हे आपल्याला दिसतं.त्यावरच आपण लग्न ठरवायला जातो. पण ती व्यक्ती सुध्दा तिच्या आतल्या जीवनाला आत्माला विसरून जाते. त्यांना पाणी घालत नाही.आपल्या समृद्धीची मुळं त्या आतल्या जीवनात आहे.
   पण त्याच्याशी न आपल्या शिक्षणाचा संबंध आहे न सभ्यतेचा. न आपल्या संस्काराचा,न आपल्या समाजाचा .आपण आपल्या मुलांना-मुलीना खूप महागड शिक्षण देत आहोत,त्यांना चांगले कपडे देत आहोत. चांगलं भोजन देत आहोत.त्यांच्या जीवनासाठी सर्व प्रकारच्या  सोयी उपलब्ध करून देत आहोत.पण तरीही तो माणूस कोमेज्लेलाच दिसतो.त्याच्या जीवनातून कुठलाच सुगंध येत नाही.
     म्हणून लग्नानंतरहि आपलं जीवन छान सुगंधित व्हावं वाटत असेल तर आपली मुळं कोणती याचा नक्की विचार करा. म्हणजे पुढच्या काही वर्षात तुम्हाला यशस्वी जोडपं म्हणून बोलवू.

No comments:

Post a Comment