Friday, 20 April 2012

परिपूर्ण


  www.daptaryswiwah.com आई मी जरा बाहेर जावून येते.थोडा उशीर होईल.,स्मिता घाईघाईने बाहेर पडत आईला म्हणाली.
 अग जरा सांगून तर जाशील का की तू कुठे जात आहेस ते?
काल आपण ज्या मुलाची माहिती वाचली ना? त्याच्या ऑफिस मध्ये.
पण त्याला न कळवताच?
बघू जमतयं का? सगळं
स्मिता एका कंपनीच्या ऑफिस मध्ये आली आणि शिपायाला विचारलं.की समीर मराठे यांचं ऑफिस कुठे आहे? तिने त्याला ते लांबून दाखवायला सांगितलं.तिने तो आत बसलेला माणूस मराठे बघितला आणि लंच ब्रेक होई पर्यंत खाली थांबली.तो खाली आल्यावर तिने स्वतःची ओळख करून दिली. त्यालाही आठवलं की घरी या मुलीच्या संदर्भात बोलणं झालं आहे. तिची भेटण्याची ही पद्धत आवडली.(  त्यामुळे घरचा एक पारंपारिक समारंभ वाचला आणि वेळ ही वाचला ).ती दोघं समोरच्या हॉटेल मध्ये गेले आणि काही खायला मागितलं.तर स्मिता म्हणाली मी फक्त कॉफीच घेईन.मी खूप हेल्थ कॉन्शस आहे.तुम्ही रोज इथे येवून खातात का?
  तर समीर म्हणाला,मी मला जे आवडतं ते असं अधूनमधून खातो.मग दोघांनी एकमेकांशी गप्पा प्लस चौकश्या केल्या आणि आपापल्या कामाला परत गेले.
  घरी येवून स्मिताने त्याला नकार कळवला.

२. अमित आज ती मुलगी तुला भेटायला येणार आहे माहित आहे ना?
     हो किती वेळा तेच तेच सांगते.येण्याआधी तिला फोन कर असं म्हटलं आहे.
 अरे तुमची भेट आठ दिवसापूर्वी ठरली होती,मग तूच वेळ काढून ठेवायला हवा.
ठेवलाय.पण सोय म्हणून तिला तसं सांगितलं.
 मला वाटतं ही मुलगी इतर मुलींपेक्षा तुझ्या अपेक्षांच्या अधिक जवळ पोहचणारी आहे.तू काही थातूर मातूर कारण सांगून नकार कळवू नको.
  मला आवडली तरच होकार कळवीन.
अरे --- आई काही बोलण्याच्या आधीच हताश होवून थांबली.
अमित संध्याकाळी आला ते मनात नकार घेवूनच.
का? काय झालं?
तिच्या चेहऱ्यावर वांग आहेत.
मग काय झालं? ज्या माणसं उजळ असतात त्याच्या चेहरा असा असू शकतो.
पण फोटोत दिसत नव्हता.
म्हणजे लांबून दिसत नाही.शिवाय हे वांग मधून मधून दिसतात.
पण मला हे पटलं नाही.
अरे मुलगी सगळ्या दृष्टीने चांगली असून तू असं करतोस हेच मला पटत नाही.
  ३.
तुम्हांला आम्ही सी.ए. असणारी मुलगी दाखवा असं म्हटलं होतं ना? तरी तुम्ही आम्हांला दुसरं स्थळ दाखवलं.
   आम्ही सांगितलेली मुलगी सी.ए.च्या परीक्षेला बसली होती.पण तिच्या वडिलांनी तिच्या माहितीत सी.ए. असं लिहलं होतं.ती केवळ २३ वर्षाची होती.पदवी परीक्षेनंतर ती ही परीक्षा देत होती.त्यांचा मुलगा ही २५ वर्षाचा होता.पण त्यांना आमचं वागणं पटलं नाही.आम्ही त्यांना चुकीचं स्थळ दिलं असं वाटलं.म्हणून ते आमच्यावर रागवले.
  खरं बघितलं तर आमच्याकडे सी.ए. झालेल्या मुली नव्हत्या हे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं.शिवाय इतक्या कमी वयात सी.ए. पूर्ण होणं अशक्य होतं.आणि केवळ सी.ए.च मुली बघणं आणि इतर शिकलेल्या मुली न बघणं म्हणजे ते स्वतःला मर्यादा घालून घेत आहेत असं आम्हांला वाटलं.कारण हे लग्न फक्त व्यवसायाशी होणार.एकमेकांच्या स्वभावाला,इतर कला गुणांना त्यात काहीच स्थान नसणार.असं वाटलं.कारण स्वभाव,आवडीनिवडी आणि व्यवसाय ही एकच जमून येणं तसं अवघड होईल.
    त्यांचं म्हणणं होतं की मला शोधत अनेक ठिकाणांहून लोक येतात.मी काही फी वगैरे भरलेली नाही.
   केवळ ती मुलगी सी.ए. नाही म्हणून त्यांनी नकार कळवला.

४.  मला एकदम सुंदरच मुलगी हवी.मी आजपर्यंत त्यासाठीच थांबलो.निलेश तावातावाने म्हणत होता.तो स्वतः ३३ वर्षाचा आहे.तो गेल्या ५ वर्षांपासून स्थळं बघत आहे.त्याला एकही मुलगी सुंदर वाटत नाही.एखादी मुलगी जर आपण त्याला सुचवली तर तो म्हणतो मी सुंदरते बाबत कोणतीही तडजोड करणार नाही.सौदर्य हे सापेक्ष असतं.शिवाय ते वयाबरोबर कमी होत जातं,बदलत जातं.शिवाय तुझी नजर कशी आहे हे यात मोडतं.तुझंही वय /लग्नाचं वय होत चाललं आहे.तू सुद्धा काही दिवसांनी आता आहे तसा दिसणार नाही.पण तो ऐकायलाच तयार नाही. त्याच्या या सुंदरतेचा व्याख्येत त आई- वडिलांच्या सूचना सुद्धा बसत नसल्याने त्यांनी त्याच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच टाकली.आणि आता तो आमच्या वर वैतागतो.
    सौदर्य हे फक्त रुपातच असतं का? ते एखाद्या व्यक्तीच्या कामात,स्वभावात,त्याच्या छोट्या छोट्या वागणुकीतही असतं.मदत करण्यात,माणुसकीतही असतं. हे आपण बघणारच नाही का? की केवळ काळ बदललाय एवढीच हाकाटी आपल्या कपड्यांमधून, आणि रोजच्या वापरण्याच्या वस्तू मधून देत राहणार.आपल्या वागणुकीत,विचारसरणीत काही बदल होणार आहेत की नाही.

५. तुम्ही आमचा एक निरोप पोहचता कराल का? मंगेशच्या वडिलांनी विचारले.काय निरोप आहे.तर म्हणाले,की त्यांना कळवा की मुला-मुलीचा रक्तगट एक येत आहे त्यामुळे आम्ही पुढे जावू शकत नाही.रक्तगट एक असेल तर काही अडचणी येत नाही.विशेषतः बाळंतपणात.फक्त निगेटिव्ह,positive असला तर थोडी अडचण येते.पण त्यावरही वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.आणि शिवाय रक्तगट हे किती मर्यादित आहेत,ते कोणाचे आणि कोणाचे सारखे येणारच.रक्तगट एक असले तर लग्न करू नये याला फारसा शास्त्रीय आधार नाही.आपण विज्ञानाचा आधार घेवून वेगळ्याच अंधश्रद्धा निर्माण तर करत नाही ना? हे लक्षात घ्यायला हवे.

६.  त्या मुलाने पहिल्या भेटीतच तिचा पगार विचारला.म्हणून आणि त्याच्या कुटुंबाचं असं काहीच उत्पन्न नाही.सगळं यांच्या पगारावरच अवलंबून राहील.म्हणून मुलीने नकार दिला.
   मुलाच्या आणि तिच्या नकार देण्यापूर्वी चार-पाच भेटी झाल्या होत्या.शिवाय ते chatchat करत होते.फोन वर बोलत होते.तो पर्यंत तिला ते छान वाटलं.पण मुलाच्या घरी गेल्यावर तिला वाटलं की हे सगळं आपल्यालाच सांभाळावं लागेल असं तिला वाटलं.म्हणून नकार दिला.
    मागच्या वेळी कुटुंबाचं उत्पन्न हे मुलाच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतं,तिच्या उत्पन्ना पेक्षा जास्त होतं,तेव्ह कुटुंबाच्या उत्पन्नाला काय महत्व द्यायचं असं वाटून तिने नकार दिला होता.
   अशी नकाराची कारणे आपण सांगितलेल्या अपेक्षेत बसणारी स्थळं असली तरी येतात कारण आपल्या माहितीत न दिलेली खूपशी माहिती दडलेली असते.meaning between lines खूप काही असतं.ते आपण लक्षात घेत नाही.सगळं काही परिपूर्ण असं हवं असतं,आणि ते तसं कधीच नसतं.

No comments:

Post a Comment