Thursday 12 April 2012

कुटुंब


                                   
कुटुंब
     www.daptaryswiwah.com  आम्हाला फक्त चांगलं कुटुंब हवं ,बाकी काही नको.आजकाल चांगली संस्कारी कुटुंब कुठे दिसतात? असें आम्हांला मुला-मुलींचे पालक नेहमी सांगत असतात.कुटुंब हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. चांगलं संस्कारी कुटुंब म्हणजे काय?किंवा तुमच्या कुटुंबाची विचारसरणी कशी आहे? असं विचारलं तर काय उत्तर येईल?प्रत्येकाला आपलं कुटुंब आदर्श वाटतं,करण आपण त्या कुटुंबात वाढलेले असतो. त्यातील अनेक गोष्टी आपल्या सवयींच्या झालेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची कुटुंबाची व्याख्या वेगवेगळी असणार हे नक्की . आदर्श कुटुंब हे प्रत्येकाने पाहिलेले स्वप्न आहे. कारण आदर्श कुटुंब हे अपोआप ready -made तयार होत नाही.त्यासाठी काही बंधेने घालून घ्यावी लागतात. जर बंधने घालून घ्यावी लागतात. जर तुम्ही म्हणाल कि आमचं कुटुंब साधं ,निर्व्यसनी,हेवेदावे नसणार आहे.हे तर तुमच्या कुटुंबाचे चांगले गुण आहेच. पण ते परंपरावादी आहे का? की पुरोगामी आहे?लोकशाही ,समानता,सामाजिक बांधिलकी   अशा कोणत्या विचारांचं आहे किवा त्या विचारांच्या  जवळ जाणारे आहेत. हे ही आपल्याला बघायला हवे.मुलगा आणि मुलगी या दोघांनी आपल्या कुटुंबाची विचारसरणी कोणती आहे हे लग्नापूर्वी लक्षात घ्यायला हवी. कारण तरच तुम्ही दुसऱ्या कुटुंबाकडून काही अपेक्षा करू शकतात. 
   आज प्रत्येकाला आपलं मानणारी आणि आपली वाटणारी एक जागा हवी आहे. ती जागा म्हणजे कुटुंब असे बहुतांशी लोकांना वाटते. लग्नातून ती गरज पूर्ण व्हावी असेही अनेकांना वाटते. आज पाश्चिमात्य देशामध्ये कुटुंब संस्था हादरतांना दिसते. कारण कुटुंब संस्थेचे स्वरूप सर्व जगभरच  बदलत आहे.कुटुंबाचा विचार करतांना तिचं बदलतं स्वरूप लक्षात घ्यायला हवं. शेतीप्रधान व्यवस्थेतल स्वरूप उद्योग प्रधान व्यवस्थेतल स्वरूप आणि आजचं जागतिकीकरणातले कुटुंबाचे स्वरूप हे वेगवेगळे  आहे. हे बदल वैयक्तिक पातळीवरही होतात.
  
म्हणूनच लग्न करतांना प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीत,वागण्याच्या पद्धतीत कुटुंबाची विचारसरणी महत्वाची भूमिका बजावत असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे चांगलं ,संस्कारी कुटुंब म्हणजे काय हे वेगवेगळ्या अंगांनी तपासून बघायला हवे. म्हणजे त्या कुटुंबातील कोणत्या घटकाशी आपल्याला जुळवून घेता येईल हे शोधता येईल. कारण भारतीय विवाह पद्धतीत दोन कुटुंबे एकमेकांशी नात्याने जोडली जातात. कुटुंबात नवीन येणाऱ्या व्यक्तीला मनाची उदारता दाखवत सामावून घेण्याची वृत्ती हवी.
  
अजूनही आपल्याकडे लग्न हे आई-वडील ,नातेवाईक यांच्या संमतीने ठरतात. त्यावेळी दोन्ही कुटुंबाचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक स्तर बघितला जातो. मात्र कुटुंबाची विचारसरणी कशी आहे,वैचारिक,सांस्कृतिक आहे का? याकडे गंभीरपणे पहिले जात नाही. काही कुटुंबात सतत माणसांची ये-जा चालू असते. काही ना काही कार्यक्रम ठरवले जातात. त्यामुळे सगळेचजन खूप काम करून आनद घेतात . तर काही कुटुंबात वर्षो न वर्षं कोणी येत नाही. थोडाही आवाज घरात होत नाही. गाणी सुधा ऐकली जात नाहीत. प्रत्येक पै-पै  चा हिशोब तपासला जातो व त्यात सगळ्यांनाच धारेवर धरले जाते. मग जी व्यक्ती उदार मनोवृत्तीच्या घरातून आली आहे ती या कुटुंबाशी कसे जुळवून घेणार? किंवा गाण्याची आवड असणारी व्यक्ती ,अभिरुची संपन्न व्यक्तीला तसेच घर मिळाले नाही तर कसं होणार? म्हणून कुटुंब कसं आहे. याचा विचार अधिक  खोलवर जावून करायला हवा. कारण आपणही होमपीच वर अधिक मोकळेपणी राहू शकतो नाही का?

No comments:

Post a Comment