Wednesday 2 May 2012

स्वच्छ नजर


  

www.daptaryswiwah.com सुनीत आणि मितालीच लग्न आमच्या कडून ठरलं  व जेव्हा ते दोघे हे सागायला आले त्या वेळेस आम्ही त्यांना विचरल कि त्यांनी एकमेकांना कसं समजून घेतलं .कसा लग्नाचा निर्णय घेतला. एकमेकांना कसं पडताळून पाहिलं?
    तर सुनीत म्हणाला की,मी मितालीच प्रोफाईल पाहिलं तेव्हा तिच्याशी संपर्क साधला. तिने पालकांशी बोलून भेटायचे ठरवले. तो म्हणाला माझ्या बहिणीने  मला  विचारले होते की, ती सुंदर आहे का? तर तो म्हणाला होता,मला ह्याचे उत्तर देता येणार नाही कारण ती कशी व्यक्त होते हे मला पाह्यला फार आवडत. तो म्हणतो की ,मिताली सहजपणे इतरांना मदत करते. ती स्वतंत्र्यही  आहे आणि प्रगल्भही आहे.
       मित्र -मैत्रिणींनो तुम्हांला हे वाचायला नक्की आवडेल की,मिताली एका छोट्या गावातून शिक्षणासाठी प्रथम शहरात आली. तिचे आई-वडील फारसे शिकलेले नाही. ते गावात धान्याचा व्यापार करतात. पण मित्लीने एकीकडे काम केले व शिक्षण घेतले. ती कोणावरही अवलंबून नाही. तिची राहणी साधी आहे. ती अशी बाहेरून एकटी शहरात  स्वतःला घडवत गेल्याने ती कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही . सुनीत म्हणतो ,ती माझ्यावरही पटकन विश्वास ठेवत नाही. याचा त्याला कधी कधी राग येतो. पण तो समजतो त्या मागचे     तिचे कारण.
       सुनीत आणि मिताली जेव्हा भेटले तेव्हा ते एकमेकांशी स्वतः च्या  लहानपणाबद्दल  बोलले. त्या दोघांच्या राहणीमान मध्ये काहीसा फरक आहे. पण त्याकडे त्यांनी नाक मुरडून न पाहता दाद देत कौतुकाने पहिले. मिताली म्हणते ,आमच्यात चांगला संवाद होतो. आम्हांला एकमेकांच्या भेटीत   ताण जाणवला   नाही.आम्ही दोघही  बुद्धिमत्ता ,संवेदन क्षमता आणि समतोल यांच चांगलं मिश्रण आहोत. आम्हांला दोघांना एकमेकांचा जोडीदार म्हणून कसा विचार करायचा ,कोणाला कशात आनंद वाटतो. काय खूप आवडत आणि काय अजिबातच  आवडत नाही. हे एकमेकांच्या फोन वरच्या संपर्कातच कळले. मग आम्ही प्रत्यक्ष  भेटलो तेव्हा परत पडताळून पहिले. एकमेकांना 'अवकाश ' कसा देता येईल याचाही आम्ही विचार केला.  
     सुनीत म्हणतो,मिताली शहरात एकटी,स्वतंत्र्य राहिली पण ती टोंम बॉय नाही आणि बायकीही नाही. ती बोलायला वागायला सहृदय ,कोमल आहे.पण धीटही आहे. दुबळी तर अजिबातच नाही. तिला स्वतःचा सन्मान आहे. तर मिताली त्याच्या बाबतीत म्हणते ," सुनीत पक्का रसिक आहे . तो त्याचे काम दुसऱ्यावर टाकत नाही. मुख्य म्हणजे त्याच्या आईने त्याला 'पुरुष' म्हणून वाढवलं नाही. त्या दोघांना ट्रेकिंग आवडते आणि चालायला तर खूपच आवडते.
      सुनीत आणि मितालीने एकमेकांना अनेक बाजूने समजावून घेत , विचार करून लग्नाचा  निर्णय घेतला. त्यांना लग्नाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या,कर्तव्य ,संकट ,कुरबुरी ,छोटे -मोठी आनंद सगळ्याचं कौतिक वाटतं. ते म्हणतात,आजकाल आम्ही लग्न झालेल्या जोडप्याचं निरीक्षण करतो,त्यांची कशावर भांडण होतात. हे बघतो आणि केस स्टडी सारखा त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे पुढे मार्ग काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल असं त्यांना वाटतं . दोघांनाही न्यूनगंड ,अहंगंड नाहीत. स्वच्छ नजरेने त्यांचे पालक आणि ते एकमेकांकडे पाहतात.
    यात सुनीत ,मिताली आणि त्यांचे पालक यांना आपले घर ,त्याची पार्श्वभूमी त्यातील पैशा बद्दलचा विचार,शिक्षण ,नोकरी शहर यांचा विचार स्पष्ट होता. त्यामुळे ते कुठेही गेले तरी स्वतःला घडवू शकतील याची त्यांना खात्री वाटते .
 असं एकमेकांना नीट समजून घेवून लग्न ठरवत असू तर हे निरोगी समाजाचं चिन्हच म्हणायला हवं नाही का?

No comments:

Post a Comment